Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024

आम आदमी पक्षाला संपवण्याचा पंतप्रधानांचा प्लॅन, गेल्या २ वर्षांपासून आमच्या नेत्यांना अटक करण्याचं सत्रं,  सुरुवात केली, अशा पद्धतीने आम आदमी पार्टी संपेल असं त्यांना वाटत असेल मात्र हा पक्ष १४० कोटी जनतेचा आहे. अरविंद केजरीवालांचं वक्तव्य. 

आपच्या खासदार स्वाती मालिवाल विनयभंग प्रकरण, केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी, विभव कुमार यांनी १३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप.

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या संयुक्त सभेत गोंधळ, राहुल आणि अखिलेश स्टेजवर पोहोचताच सुरक्षा कठडे तोडून समर्थक स्टेजकडे. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेकजण जखमी. 

लडाखच्या दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर हवाई दलाच्या विमानाने मतदान साहित्य रवाना,  झंस्कर उपविभागातील सर्व ४४ मतदान केंद्रं सज्ज, मोठ्या संखेनं सहभागी व्हावं, निवडणूक अधिकाऱ्यांचं आवाहन. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola