Lockdown | संचारबंदीचं उल्लंघन केल्याने भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल
वर्ध्याच्या आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसाला आज मोठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नसल्याचे आरोप झाले. शासनाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.