Be Positive | वर्ध्याच्या तीन वर्षीय आर्या टाकोनेची कमाल, एक किमीचं अंतर सहा मिनिटात पार...
वर्ध्याच्या पुलगाव इथली आर्या पंकज टाकोने... वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट अॅन्थोनी इंटरनॅशनल स्कुलपर्यंत एक हजार मीटरचं अंतर आर्यानं अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात पार केलयं... आज सकाळी सात वाजताच्या सुमारास हा रेकॉर्ड नोंदवल्या गेला... इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यास आठ मिनीटं तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सात मिनीटांचा वेळ दिला होता.. आर्यानं हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण करून रेकार्डवर नाव कोरलयं..