Walmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

Walmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

वाल्मिक कराड पुण्यात शरण आला मात्र तो २२ दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला याची माहिती  एबीपी माझाला मिळालीय. खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आलीय. तर त्यानंतर सुरूवातीचे दिवस तो पुुण्यात राहिला.

बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलावलं.

वाल्मिक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात झाली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची चौकशी सुरु आहे. सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिलाच दिवस आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलावलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola