Modi - Shah Draupadi Murmu : मोदी - शाह एकाच दिवशी राष्ट्रपतींच्या भेटीला,चर्चांना उधाण ABP MAJHA
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल राष्ट्रपतींची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, संसदेतील कोंडी आणि अमेरिकेकडून लावण्यात येणाऱ्या २५ टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरआढाव्यावरून संसदेत सध्या कोंडी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राजीनामा दिला होता. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक शनिवारी नागपुरात पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाची आगामी निवडणूक आणि भाजपमधील अपेक्षित संघटनात्मक बदल यावर चर्चा झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर, सर्व संघटनात्मक पदांसाठी भविष्यात संघ विचार परिवारातीलच उमेदवार असावा, अशी चर्चा बैठकीत होती. राष्ट्रीय पातळीवरील काही महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाल्याचेही कळते.