ABP Majha Headlines : 07 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 4 Aug 2025 : ABP Majha

Continues below advertisement
पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांनी मारहाणी शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन दलित मुलींनी रात्रभर ठिय्या दिला. रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी त्यांची भेट घेऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक होणार असून, महामंडळ वाटप आणि नेत्यांमधील नाराजीवर चर्चा अपेक्षित आहे. महादेवी हत्तीणीला वनतारात नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या १४० जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. या कारवाईविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकरांना मुख्यमंत्र्यांनी पाठाकण केली. बोर्डीकरांचे वक्तव्य अर्धवट दाखवले गेले, तर शिरसाटांचे वक्तव्य चुकीचे वाटत नसल्याचे फडणवीसांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक आयोगाने तेजस्वी यादवांना दोन ठिकाणी मतदार नोंदणी असल्याच्या संशयावरून नोटीस बजावली आहे. पत्रकार परिषदेत दाखवलेला EPIC नंबर आणि मूळप्रत आयोगाने मागितली आहे. दिल्लीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, भेटीचे कारण स्पष्ट नाही. भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत भारताला विजयासाठी चार विकेट्सची, तर इंग्लंडला ३५ धावांची गरज आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola