Satyacha Morcha : फोडून काढा, ठाकरेंचा एल्गार! सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा Special Report
Continues below advertisement
मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हा व्हेरिफिकेशनचा अर्ज ऑनलाईन केलाय, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंलाच माहिती नाही,' असा धक्कादायक दावा उद्धव ठाकरेंनी केला. सक्षम ॲपद्वारे बनावट अर्ज करून मतदार यादीतून नावे वगळण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. या आरोपांना भाजपने 'मूक आंदोलना'ने उत्तर दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोर्चा म्हणजे निवडणुकीतील पराभवासाठी कारणे देण्याचा 'राजकीय स्टंट' असल्याचे म्हटले, तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement