Voter List Row: 'माझ्या कुटुंबाची ४ नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव', Uddhav Thackeray यांचा आरोप
Continues below advertisement
मतदार यादीतील गोंधळावरून (Voter List Row) राजकारण तापले असून, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. 'माझ्या कुटुंबाची चारही नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला', असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. सक्षम (Saksham App) नावाच्या ॲपवरून खोट्या मोबाईल नंबरद्वारे त्यांच्या नकळत व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करण्यात आला होता, त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकाराविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या कथित प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (MVA) मुंबईत मोर्चा काढला, ज्यात राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांसह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले. तर दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने (BJP) हा मोर्चा 'खोटारड्या लोकांचा' असून, महाविकास आघाडी राजकीय वैफल्यातून खोटे नॅरेटिव्ह तयार करत असल्याची टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement