Zero Hour :'अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे ढकला, तीच परिस्थिती Uddhav-Aaditya Thackeray यांची'

Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या आरोपांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो, ते परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात, तशीच काहीशी अवस्था आज विरोधकांची झाली आहे,' असा घणाघात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केला. आदित्य ठाकरे हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नक्कल करत असून, पराभवाच्या भीतीने ते निवडणूक आयोगावर (Election Commission) आतापासूनच आरोप करत असल्याचे म्हटले आहे. मतदार यादीत आक्षेप नोंदवण्यासाठी लोकशाहीत प्रक्रिया आहे, मात्र त्याचा वापर न करता केवळ गोंधळ निर्माण केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या मोर्चावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola