Voter List Row: 'बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल आभार', Rohit Pawar यांचा Ashish Shelar यांना टोला

Continues below advertisement
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'मतदार यादीमध्ये दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल आशिष शेलार यांचे आभार', अशा शब्दात रोहित पवारांनी शेलारांवर निशाणा साधला आहे. मुंबईत (Mumbai) होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर उत्तर देताना शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांच्या मतदारसंघातच दुबार मतदार असल्याचा दावा केला होता. पवारांनी याच मुद्द्यावरून शेलार यांनी अप्रत्यक्षपणे बोगस मतदार असल्याचे मान्य केले आहे, असे म्हणत त्यांना धन्यवाद दिले आहेत. या राजकीय वादामुळे महाराष्ट्रातील मतदार यादी शुद्धीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola