Voter List Politics: दुबार मतदारांवरून घमासान, ठाकरे बंधूंवर भाजपचा गंभीर आरोप
Continues below advertisement
राज्यातील राजकारणात दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. भाजपने (BJP) थेट ठाकरे बंधूंवर (Thackeray Brothers) गंभीर आरोप केले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 'राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरे जी मुस्लिम, धार्जिणे, मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तडीका उचलतायत,' असा थेट आरोप भाजपने केला आहे. निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकारी भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत असल्याचा आरोप मविआकडून (MVA) करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देताना भाजपने, आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाही, पण आमच्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर देऊ, असे ठणकावले आहे. सांगली ते मुंबईपर्यंतच्या मतदार याद्यांमधील दुबार नावे रद्द करण्याची मागणी आम्ही आधीच केली असून, निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही भाजपने स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement