Voter List Row: '४० वर्षांच्या राजकारणात मतदार यादीत इतका घोळ कधीही पाहिला नाही' - एकनाथ खडसे
Continues below advertisement
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी या प्रकरणी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 'आक्षेप निवडणूक आयोगावर आहे आणि उत्तर भाजप देत आहे,' असा थेट सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. गेली चाळीस वर्षे राजकारणात असून, मतदार याद्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ कधीही पाहिला नसल्याचे खडसे म्हणाले. तर, दुसरीकडे नितीन राऊत यांनी भाजपवर 'वोट चोरी'चा आरोप करत, आशिष शेलार यांनी राहुल गांधींच्या आरोपांना एकप्रकारे समर्थनच दिले आहे, असे म्हटले आहे. या सदोष मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेणे हा अन्याय ठरेल, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement