Post Office Scam: 'सही काढण्याच्या स्लिपवर घेतली', महिला Postmaster ने गावकरी लुटले?
Continues below advertisement
पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) महिला पोस्टमास्टरने (Lady Postmaster) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आरडी (RD) आणि एफडी (FD) खातेधारकांना बनावट पासबुक देऊन आणि पैसे काढण्याच्या स्लिपवर सह्या घेऊन ही फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गावकऱ्यांच्या आरोपानुसार, 'पैसे भरण्याच्या स्लिपवर सही घेण्याऐवजी पैसे काढण्याच्या स्लिपवर सही घेत पैसे काढले गेले'. अनेक महिन्यांपासून पासबुक न देणे, आरडी खात्यात पैसे न टाकणे आणि त्याच्या पावत्या न देणे असे प्रकार सुरू होते. एफडी खातेधारकांनाही खोट्या नोंदी करून बनावट पासबुक देण्यात आले, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement