Voter List Row: मतदार यादीवरून बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान
Continues below advertisement
महाराष्ट्रातील मतदार यादीतील गोंधळावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीतून निवडून आले आहेत, आमचे खासदार हे होट चोरी करून निवडून आले आहेत, हे का बोलत नाहीये?', असा थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा हीच मतदार यादी होती, मग आताच त्यावर आक्षेप का घेतला जात आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मतदार यादी सदोष असेल, तर निवडून आलेल्या खासदारांची निवडणूकही चुकीची आहे, हे ठाकरेंनी जाहीर करावे, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement