Maharashtra Politics : शेलारांनी फडणवीसांना 'पप्पू' ठरवलं, Uddhav Thackeray यांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
मतदार यादीतील घोळावरून (Voter List Controversy) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावर केलेले आरोप म्हणजे 'खोदा पहाड और चुहा भी नहीं निकला' असे म्हणत, 'किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका,' असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उल्लेख करत म्हटले की, शेलार यांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीसांनाच 'महाराष्ट्राचा पप्पू' ठरवले आहे. आमच्या आरोपांना किंमत नसेल, तर किमान आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीला तरी किंमत द्यावी, असे आव्हानही ठाकरेंनी दिले. त्यामुळे हा वाद आता वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement