Vote Jihad: मतदार यादीतील घोळावरून शेलारांचा 'वोट जिहाद'चा गंभीर आरोप
Continues below advertisement
भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? मुस्लिम दुबार मतदारांवर तुमची भूमिका वेगळी आहे, हा वोट जिहाद आहे', असा गंभीर आरोप शेलार यांनी केला. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत शेलारांनी विरोधकांना टोला लगावला आणि इस्लामपूर, कर्जत-जामखेड, डोंबिवली, भिवंडी यासारख्या मतदारसंघातील मुस्लिम नावांची उदाहरणे देत दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. याउलट, विरोधकांनी शेलारांचे आरोप हे केवळ चर्चेत राहण्यासाठी असून, निवडणूक आयोग भाजपचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत असल्याचा पलटवार केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement