Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचं रुप, मंदिराचं रुपडं पालटणार
Continues below advertisement
पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुपडे आता पालटणार आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील मंदिर आता विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे. नाही घडविला, नाही बैसविले असे विठुरायाच्या बाबतीत वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे या स्वयंभू विठुरायाच्या राऊळीला देखील त्याचे मूळ रूप देण्यासाठी एक आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देताना रोज मंदिरात वाढत जाणारी गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात याचाही विचार केला जाणार आहे. यासाठीच तयार होणाऱ्या आराखड्याची आज (गुरुवारी 8 जुलै) बैठक झाली.
Continues below advertisement