Vishal Agarwal Father:विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध, खुनाच्या प्रयत्नाचा होता गुन्हा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Porsche Car Accident : पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा झाला असून अग्रवाल कुटुंबीयांना पोलिसांचा वरदहस्त हा काही नवा नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं असून त्यासंबंधी एबीपी माझीकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे.
पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे.
खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांचा वरदहस्त
भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे.
मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.