Power of Attorney: Australia दौऱ्यापूर्वी Virat Kohli चा मोठा निर्णय, Gurugram मधील मालमत्ता भाऊ Vikas Kohli कडे हस्तांतरित

Continues below advertisement
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) जाण्यापूर्वी दिल्लीतील (Delhi) गुरुग्राममधील (Gurugram) आपल्या मालमत्तेचे हक्क भाऊ विकास कोहलीकडे (Vikas Kohli) सोपवले आहेत. पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनमध्ये (London) राहत असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी विराटने मंगळवारी गुरुग्राममधील तहसील कार्यालयात जाऊन पॉवर ऑफ ॲटर्नीची (Power of Attorney) नोंदणी केली. दिल्लीच्या गुरुग्राममधील डीएलएफ फेज-१ मध्ये विराटचा एक आलिशान बंगला आणि फ्लॅट आहे. सध्या तो कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाल्यामुळे, भारतातील मालमत्तेची देखभाल आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्याने हे हक्क आपल्या भावाला दिले आहेत. यानंतर, तो भारतीय संघासह दिल्ली विमानतळावरून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola