Voter Data Breach: 'डोनाल्ड ट्रम्प तात्या' बनले मतदार, एका क्लिकवर बनावट Voter ID, सिस्टीम किती सुरक्षित?

Continues below advertisement
ऑनलाइन वेबसाईट्सच्या माध्यमातून बनावट मतदार ओळखपत्र (Fake Voter ID) बनवता येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वेबसाईट्सवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावासह कोणतीही खोटी माहिती भरून बनावट ओळखपत्र तयार होत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 'सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते?' असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. बनावट नाव, पत्ता आणि खोटा आधार क्रमांक टाकून काही मिनिटांत मतदार ओळखपत्रासारखे दिसणारे कार्ड तयार होत असल्याने खळबळ उडाली आहे. या बनावट ओळखपत्रांमुळे मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नावांचा समावेश होण्याचा आणि निवडणुकीत गैरप्रकार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) माहिती सुरक्षा प्रणालीतील त्रुटी आणि डेटा चोरीच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत, ज्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आयोगासमोर उभे राहिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola