Viral Video: 'मुक्त संचार'! पवनी पोलिसांना मध्यरात्री दिसली Shadow वाघीण आणि ३ बछडे

Continues below advertisement
भंडाऱ्याच्या पवनी-खापरी मार्गावर (Pavani-Khapri Road) मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना उमरेड करांडला अभयारण्यातील (Umred Karhandla Sanctuary) प्रसिद्ध शायडो (Shadow) वाघिणीचे दर्शन झाले. पोलिसांनी या वाघिणीचा तिच्या तीन बछड्यांसह रस्त्यावर मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 'शायडो' वाघीण आणि तिच्या परिवाराला पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. T-20 या नावाने ओळखली जाणारी ही वाघीण सध्या तिच्या तीन बछड्यांसह पवनीजवळील जंगलात वास्तव्यास आहे आणि पर्यटकांना नियमितपणे दर्शन देत आहे. पोलिसांनी काढलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola