NCP Lavani Row 'अशा गोष्टी करण्यासाठीच पक्ष चोरला का?', कार्यालयातील डान्सवर Supriya Sule संतापल्या.
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नागपूर कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी नृत्य सादर झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकाराबद्दल कारवाईचे आश्वासन दिले आहे. 'अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे, लोकांची सेवा करण्यासाठी आणि धोरण ठरवण्यासाठी राजकीय पक्ष असतो,' अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. महाराष्ट्रात शेतकरी, महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असताना पक्षाच्या कार्यालयात असे प्रकार घडणे वेदनादायी असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, 'ज्या पक्षाचेच बारा वाजवून टाकले', अशी टीका केली आहे. या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगत संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे एबीपी माझाला सांगितले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement