Omkar Beat Case :'ओंकार' हत्तीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत 'ओंकार' नावाच्या हत्तीला दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरच घडल्याने संताप व्यक्त होत आहे. 'ओंकार हत्तीला अनावश्यक वेदना किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी', अशी मागणी प्राणीमित्र तुषार देसाई यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती भातशेती आणि बागांचे नुकसान करत होता. दरम्यान, या हत्तीला गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्याची तयारी वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयात दर्शवली आहे. या प्रकरणी कायद्यानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola