Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

Continues below advertisement

Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं

रमाकांत आचरेकर स्मृती अनावरण सोहळ्यासाठी मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ-मोठ्या लोकांसमोर पार पडला. सचिन तेंडुलकर, संजय बांगर, पारस म्हांबरे, प्रवीण आंब्रे, समीर दिघे, बलबिंदर संधू - महाराष्ट्राचे राजकीय नेते राज ठाकरे यांच्यासमवेत भारतीय दिग्गजांनी स्मारकाचे अनावरण केल्यानंतर एका मंचावर एकत्र दिसले.मुंबईत सचिन तेंडुलकरने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण समारंभात त्याचा मित्र विनोद कांबळी यांची पुन्हा भेट घेतली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेंडुलकर आणि कांबळी हे आचरेकरांचे शिष्य होते, ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेटची सुरूवात केली आणि दोघांनीही क्रिकेट विश्वात नाव कमावले. 

दोन्ही क्रिकेटपटू किशोरवयापासूनच उत्कृष्ट फलंदाजी करायचे, याचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना जाते. शालेय क्रिकेटमध्ये या दोघांनी 664  धावांची मोठी भागीदारी केली होती ज्यामुळे दोघांनाही क्रिकेट जगतात पहिली ओळख मिळाली होती. कांबळी आणि तेंडुलकर हे रमाकांत आचरेकर यांचे दोन महान शिष्य म्हणून ओळखले जातात. सचिन जगातील महान क्रिकेटपटू बनला असला, तरी प्रतिभा असूनही कांबळीला त्याच्या चुकांमुळे कारकीर्दीत चढउतार पाहावे लागले. मात्र आता ही जोडी पुन्हा एकत्र दिसली आणि यावेळी आपल्या जीवलग मित्राला पाहून विनोद कांबळी भावूक झाल्याचे दिसून आले, या घटनेचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram