Vinayak Raut : रत्नागिरीत सर्वाधिक निधी या बंधाऱ्याला, प्रकल्पामुळे गावाचं संरक्षणही होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये आयोजित आढावा बैठकीला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विकास कामांचा शुभारंभ केला. यावेळी रत्नागिरी येथील मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक आणि कार्यक्रम कामाचा शुभारंभ करण्यात आला. सतेज पाटील, उदय सामंत, अनिल परब ही नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.