EXCLUSIVE : बाटगा नेहमी कोडगा, राणेंवर टिका, रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा : विनायक राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. दानवे यांनी पंतप्रधान मोदी काम करणारे बैल आणि राहुल गांधी सांड असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली असून त्यातून विकृती दिसते अशी टिका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून दानवेंच्या विधानाची दखल मोदींनी घ्यावी अशी शब्दात राऊत यांनी रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल केला आहे.