Swatantrya Veer Savarkar | विधानसभेत सावरकरांवरून हलकल्लोळ! कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदीची मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यानतंर विरोधकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. यानंतर गौरव प्रस्तावाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.