Beed Doctor Death: 'आमच्या लेकीची बदनामी थांबवा!'; डॉ.मृत्यू प्रकरणी कवडगाव ग्रामस्थ आक्रमक

Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील कवडगाव बुद्रुक (Kavadgaon Budruk) येथे एका महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले आहे. 'गावच्या लेकची बदनामी थांबवा', अशी मागणी करत काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले. या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. फलटण येथे कार्यरत असलेल्या या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, मात्र कुटुंबीय आणि ग्रामस्थ यामागे मोठे षडयंत्र असल्याचा दावा करत आहेत. या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापले असून, या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. आरोपींना अटक झाली असली तरी, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थ आग्रही आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola