कर्जमुक्तीची तारीख सांगा, नाहीतर रेल्वे रोखू - बच्चू कडूंचा इशारा.

Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमुक्तीसाठी (Farmer Loan Waiver) नागपुरात आंदोलन तीव्र झाले आहे. 'कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आमची बंड मरायला तयार आहे,' असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीला बच्चू कडू आणि इतर प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, जोपर्यंत कर्जमुक्तीची निश्चित तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मागणी मान्य न झाल्यास उद्यापासून 'रेल रोको' करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलकांनी जामठा येथील महामार्ग रिकामा केल्याने वाहतूक कोंडी फुटली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola