Vijay Wadettiwar : मराठा समाजाला सरकारनं फसवण्याचं काम केलं...विजय वडेट्टीवारांटचं वक्तव्य

Continues below advertisement

Vijay Wadettiwar :  मराठा समाजाला (Maratha Reservation) फसवण्याचे काम सरकारने केले, हे लपून राहिलेले नाही. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी घेतला आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले, हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारे आरक्षण दिलेय, अशी मराठा समाजाची समज झाली आहे, किंवा त्यांना कळून चुकले आहे. तोच रोष समाजाचा सत्ताधाऱ्यांविरोधात आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram