चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य म्हणजे मानसिक संतुलन बिघडण्याचा प्रकार, भुजबळांना दिलेल्या धमकीनंतर वडेट्टीवारांचा निशाणा
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना धमकी दिली आहे. छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं ते म्हणाले.