Eknath Shinde यांचं Fake Signature प्रकरण अधिवेशनात गाजलं, वडेट्टीवारांचा हल्लाबोल Maharashtra

Continues below advertisement

मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आलं आहे. असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने आणि पत्रं पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद, बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram