BJP's Washing Machine : 'ड्रग्ज माफिया शुद्ध करणारी भाजपची नवी मशीन', Omraje Nimbalkar यांची टीका
Continues below advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये प्रवेश दिल्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, तरुणींना व्यसनाच्या आहारी लावून पुढची पिढी बरबाद करणाऱ्या लोकांना राजकीय आश्रय दिला जात असल्याचा आरोप केला आहे. 'आता ड्रग्सवाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहेत त्यांनी, आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत... बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून देतात,' अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, अनेक नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement