PCMC Poll Alliance: पिंपरी-चिंचवडमध्ये युतीसाठी अजित पवार शरद पवारांना भेटणार-योगेश बहल

Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवली असून, ते शरद पवार यांच्याशी अंतिम चर्चा करणार असल्याचे समजते. दुसरीकडे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटले आहे की, 'भाजप ही भ्रष्टाचारी आहे आणि त्यांना या शहरातल्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही अजित पवार गटासोबत जायला तयार आहोत, पण त्यांनी भाजपचे विचार सोडून आमच्यासोबत यावे.' या संभाव्य युतीमुळे मतांचे विभाजन टळेल आणि भाजपला शह देता येईल, असे दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांचे मत आहे, मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतरच होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola