Vijay Wadettiwar : Nashik - Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये होणारे दंगे सरकार पुरस्कृत

Continues below advertisement

नाशिक : बांगलादेशातील मुद्यावरून सकल हिंदू समाजातर्फे (Sakal Hindu Samaj) शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला (Nashik Band) जुन्या नाशकात हिंसक वळण लागले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर दुकाने बंद करण्यावरून दोन गट आमनेसामने आले होते. त्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक करण्यात आल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी (Nashik Police) जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराचा मारा केला. यात दोन पोलीस उपायुक्त जखमी झाले. या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. 

नाशिक शहरात घडलेल्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. 

कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नये : दादा भुसे 

मंत्री भुसे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, कायदा हातात घेऊन सलोखा बिघडेल असे वर्तन टाळावे, प्रशासनाला सहकार्य करून शहराची शांतता भंग होणार नाही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये संशयास्पद काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहान देखील यावेळी केले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram