Vijay Shivtare : विजय शिवतारे अजिदादांना धक्का देण्याच्या तयारीत, बारामतीत मोठा निर्णय जाहीर

Continues below advertisement

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी एबीपी माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्यासोबत बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram