Vijay Shivtare Meeting : विजय शिवतारेंनी बोलावली तातडीची बैठक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक

Continues below advertisement

Vijay Shivtare Meeting : विजय शिवतारेंनी बोलावली तातडीची बैठक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक 
बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल उमेदवारीचे संकेत दिले होते. याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीये. आज सकाळी ११ वाजता सासवड इथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. दोन दिवसांपूर्वी महिला मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पवारांना पाडा अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काल पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत शिवतारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram