Thackeray Group vs Shinde Group : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाची मागणी फेटाळली, कामकाज सल्लागार समितीत स्थान नाही

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची कामकाज सल्लागार समितीत स्थान देण्याची मागणी फेटाळून धक्का दिला. ठाकरेंच्या शिवसेनेनं गटनेते म्हणून अजय चौधरी यांना तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना कामकाज सल्लागार समितीत स्थान देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळून लावली. दुसरीकडे शिंदे गटाकडून आलेल्या पत्राला मान्यता देत उदय सामंत आणि दादा भुसे यांची कामकाज सल्लागार समितीत सदस्य म्हणून नियुक्ती केली. १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अध्यक्षांनी झटका दिलाय. आणि थोड्याच वेळात विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरु होतेय.. आणि या बैठकीसाठी नेते दाखल व्हायला सुरुवात झालीय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola