Vidhansabha Election Special Report: विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी?

Continues below advertisement

Vidhansabha Election Special Report: विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी?  कोरोना काळापासून महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. खरं तर एखाद्या महापालिकेवर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक लावता येत नाही. पण कोरोनाचं संकट अभूतपूर्व मानून निवडणुका पुढं ढकलल्या गेल्या. आजही प्रशासनच महापालिकांचं कामकाज पाहिलं जातंय. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.त्यामुळंही या निवडणुका रखडल्या.त्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.तेव्हापासून या निवडणुकांना मूहूर्त मिळेना.निवडणुका कधी होतील याची उत्सुकता असतानाच आता सत्तेतला प्रमुख पक्ष भाजपनं या निवडणुकांची तयारी सुरु केलीय.  काय आहे भाजपची स्वराज्य संस्थांची तयारी? महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप वॉर्डनुसार जबाबदारी देणार विधानसभा निवडणुकीबरोबरच महापालिकेची तयारी सुरु करणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच भाजप हा विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील जोरदार तयारी करतय. त्यामुळं विधानसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार हे स्पष्ट आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram