Vidhan Sabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Assembly Election 2024 : 8 Pm

Continues below advertisement

Vidhan Sabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Assembly Election 2024 : 8 Pm

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत ३५ लाखाने वाढ,  विधानसभा निवडणुकीसाठी ३५ लाख ६२ हजार ६८ मतदार वाढले, प्रत्येक मतदारसंघांत दहा हजार मतदार वाढल्याचा आरोप. 

परभणी जिल्ह्यात पहिल्याच दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज खरेदी, ४ विधानसभा मतदारसंघात ७४ भावी आमदारांकडून १४४ उमेदवारी अर्जांची खरेदी. 

पहिल्या दिवशी बीड तहसील मधून 145 तर परळी तहसील मधून 49 उमेदवारी अर्जांची विक्री, परळीत  राजेभाऊ फड यांनी दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज, बीडमधून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही.

२८ तारखेला बारामती मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणार. 

भाजप आणि राष्ट्रवादीत काही जागांवरुन रस्सीखेच सुरुच, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने दिल्लीत. 

निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार, घड्याळ चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली,  

गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी जयंत पाटलांच्या उपस्थित हाती घेतली तुतारी, मंदा म्हात्रेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता, २५ माजी नगरसेवकांसह केला शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. 

अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक २३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, उमेदवारी अर्ज भरण्यााधी सना मलिक करणार शक्तिप्रदर्शन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram