TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha

Beed Parli Firing : बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून रोज घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्णतः बोजवारा उडाला आहे का असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे प्रकरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे पोलिस सांगत असले तरी याला राजकीय रंग असल्याची चर्चा आहे.   वेळ रात्रीची सव्वा आठ वाजता, ठिकाण परळी शहरातील बँक कॉलनीमधील परिसर. फारशी रहदारी नसलेल्या या भागात लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि याच गोळीबारामध्ये एक जण जागीच कोसळला. त्यांचं नाव होतं बापू आंधळे (Bapu Andhale Beed) . परळी शहरापासून जवळ असलेल्या मरळवाडी या गावचे सरपंच. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  राजकारणातील वादातून गोळीबार असं असलं तरी या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे. बापू आंधळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते (Baban Gite Beed) यांच्या पॅनल मधून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडे यांची साथ दिली. पैशाच्या व्यवहारातून या दोन गटात गोळीबार झाला असला तरी या ठिकाणी धनंजय मुंडे गट आणि बबन गीते गट असाच हा वाद होता. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी या गोळीबाराततील आरोपी आणि तक्रारदार हे सगळेजण एकत्रितच काम करत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram