Vidhan Parishad Election Nagpur: पहिल्या फेरीत बावनकुळे आघाडीवर ABP Majha
Continues below advertisement
विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या दोन्ही जागांवर विजय मिळवत भाजपनं महाविकास आघाडीला दणका दिलाय. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल १७६ मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपला दणका देण्याची तयारी केलेल्या महाविकास आघाडीचीच १६ मतं फुटल्याचं समोर आलंय. तर अकोला-वाशिम-बुलढाण्याची जागा भाजपनं शिवसेनेकडून खेचून घेतली. तिथं याआधी तीनवेळा विजय मिळवलेले शिवसनेचे गोपीकिशन बाजोरिया तब्बल ११० मतांनी पराभूत झालेत. अकोल्यातही महाविकास आघाडीची तब्बल ८० मतं फुटल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement