Ghoti Viral Video : अमानवीय कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
एका चालत्या ट्रकवरून बकऱ्या रस्त्यावर फेकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय.. मात्र विडिओची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे...दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे आणि बकऱ्या रस्त्यावर का फेकण्यात आल्या याचा तपास पोलीस करतायत... सुरवातीला उतर प्रदेशातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आलं होतं मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी इगतपुरीतल्या घोटी जवळचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय..
Tags :
Viral Igatpuri Uttar Pradesh Police Case Registered Unknown SOCIAL MEDIA VIDEO Moving Trucks Goats Throwing On The Road More Investigation