Vidarbha Exit Poll 2024 : विदर्भात काँग्रेसला 3 तर ठाकरेना 1 जागा मिळणार, पत्रकारांचा अंदाज काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Exit Poll 2024 : विदर्भात काँग्रेसला 3 तर ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळणार?
Exit Poll Result 2024 नागपूर : देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मतदानाची रणधुमाळी आज संपुष्टात येत आहे. देशात शनिवारी लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडत आहे. त्यानंतर येत्या 4 जून रोजी देशात सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी हे मतदान संपत असताना सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Exit Poll 2024) आकडेवारी जाहीर झाली आहे. यापैकी एबीपी-सी व्होटर (ABP-CVoter या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एबीपी-सी व्होटरच्या आजच्या एक्झिट पोलमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक राज्याचा निकाल जाहीर झाला. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोल्सचे सर्वेक्षण देशातील सर्वात अचूक मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये गणले जाते. त्यातच महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी वरचढ ठरणार, याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.