Vice President Polls : देशात आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक,NDA आणि INDIA आघाडीकडून मोर्चेबांधणी
आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात आहे. देशाला लवकरच नवे उपराष्ट्रपती लाभणार आहेत. आज सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एनडीएने सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) चे चार राज्यसभा खासदार आणि बीजेडी (BJD) च्या सात खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या गैरहजेरीमुळे इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो.