ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 September 2025 : ABP Majha

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून मोठा संघर्ष सुरू आहे. पोलिसांसोबतच्या धुमश्चक्रित एकवीस आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी मोठी घोषणा केली आहे की, पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही. नेपाळच्या कंपनी कायद्यानुसार नोंदणी न केल्यानं संबंधित अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. बीआरएस आणि बीजेडीने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबतं सुरू आहेत. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस मोर्चेबांधणी करत आहे आणि सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे, तर यशवंत बिवलकरांची आज पत्रकार परिषद आहे. आशियाई चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उद्या भारतीय संघ युएई संघासोबत पहिला सामना खेळणार आहे. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना अभिनेता आर माधवनने टीजर शेअर केल्यानंतर उधाण आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola