Vice President Election Result | उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी.राधाकृष्णन 152 मतांनी विजयी
सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चारशे बावन्न मतं मिळवून विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली. एकूण सातशे एक्क्याऐंशी मतदार होते, त्यापैकी सातशे बावन्न मतं वैध ठरली तर पंधरा मतं बाद झाली. सी पी राधाकृष्णन शंभर बावन्न मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत चौदा खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज आहे, त्यामुळे एनडीए आघाडीला धक्का बसल्याची चर्चा आहे. यानंतर सी पी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी सी पी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “विपक्षी लोक बडबोलापन कर रहे थे। बिना किसी कारण के एक वातावरण तैयार करने की कोशिश कर रहे थे की एनडीए के वोट बटेंगे, एनडीए के वोट फुटेंगे और उनको मतदार होगा। लेकिन प्रत्यक्ष रूप से उलटा हुआ है। प्रत्यक्ष रूप से विरोधी पार्टियां अपने वोटों को नहीं बचा पाई।” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून सी पी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले.