Balen Shah Profile : नेपाळचे होणारे नवे पंतप्रधान बालेन शाह कोण आहेत?
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप बंदी विरोधात सोमवारी लाखो तरुण रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी नेपाळमधील महत्त्वाच्या इमारती आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले. थेट सुप्रीम कोर्टात जाळपोळ करण्यात आली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांची घरे जाळण्यात आली. या हिंसक आंदोलनात पंचवीस जणांचा मृत्यू झाला. उद्रेकानंतर पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यासह अकरा मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामे दिले. नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. रवी लामिछाने, बालेन शाह आणि लष्करप्रमुखांची बैठक झाली. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत. बालेन शाह, जे नेपाळी रॅपर आणि काठमांडूचे महापौर आहेत, ते पंतप्रधान पदासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवि लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली. ओली शर्मा नेपाळ सोडून दुबईत जाण्याची शक्यता आहे.