Vice President Election | उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक,फडणवीस मविआच्या नेत्यांशी चर्चा करणार
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. या निवडणुकीत व्हीप लागू नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले होते. आता ते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधताना दिसतील. या चर्चेतून काय साध्य होते आणि महाविकास आघाडीकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.