Amit Shah Monsson Session : 130 वं घटना दुरुस्ती विधेयक आणि राजकीय घमासान

भारतात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसोबतच देशाच्या राजकारणात एका विधेयकामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. लोकसभेत १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाला जोरदार विरोध झाला. विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्र्यांकडे भिडकावल्या. त्यानंतर काँग्रेसच्या एका खासदाराने गृहमंत्र्यांना त्यांच्या गुजरातचे गृहमंत्री असताना झालेल्या अटकेवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्यावर खोटे आरोप झाले होते आणि अटक होण्यापूर्वीच त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. जोपर्यंत कोर्टाकडून निर्देश मिळाले नाहीत, तोपर्यंत त्यांनी कोणतेही संवैधानिक पद स्वीकारले नाही. या नव्या विधेयकात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना तुरुंगवारी करावी लागल्यास त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे. कोणत्याही आरोपाखाली सलग तीस दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्याला एकतिसाव्या दिवशी मंत्रीपदावरून हटविण्याची तरतूदही विधेयकात आहे. विशेष म्हणजे या कायद्याच्या कक्षेत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री हेही असतील. सध्या अटकेतील मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यात तरतूद नाही. अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन, सेंथिल बालाजी आणि नवाब मलिक यांसारख्या नेत्यांनी तुरुंगात असतानाही मंत्रीपदे भूषवल्याची उदाहरणे आहेत. हे टाळण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola